पीएम किसान योजनेच्या खात्यात नाही जमा झाली रक्कम ? शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan चे पैसे जमा झालेले आहेत, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नसतील; तर तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल, तरच तुम्हाला PM Kisan योजनेचे पैसे मिळणार आहेत. PM KISAN योजनेचा 13 वा हप्ता येऊन 3 आठवडे पूर्ण झाले आहेत, 22 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी एवढी रक्कम सरकार द्वारे जमा करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळालेला नाही. 13 वा हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारद्वारे शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती, त्या यादीनुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळण्यात आलं होतं. पण अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अपूर्तते मुळे देखील PM Kisan योजनेचा 13 हप्ता मिळालेला नाही आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana)...