पीएम किसान योजनेच्या खात्यात नाही जमा झाली रक्कम ? शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan चे पैसे जमा झालेले आहेत, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नसतील; तर तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल, तरच तुम्हाला PM Kisan योजनेचे पैसे मिळणार आहेत.
PM KISAN योजनेचा 13 वा हप्ता येऊन 3 आठवडे पूर्ण झाले आहेत, 22 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी एवढी रक्कम सरकार द्वारे जमा करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळालेला नाही. 13 वा हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारद्वारे शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती, त्या यादीनुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळण्यात आलं होतं. पण अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अपूर्तते मुळे देखील PM Kisan योजनेचा 13 हप्ता मिळालेला नाही आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार (PM-KISAN Scheme Complaint Number) दाखल करता येते.
शेतकरी बांधवांनो! ज्यांना पीएम किसान चा 13 वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी पैसे मिळवण्यासाठी काय करायचे हे आम्ही या पोस्टमध्ये सांगणार आहोत.
PM Kisan योजनेसाठी नोंदणी अर्ज करत असताना, जर शेतकऱ्यांनी बँक पासबुकची चुकीची प्रत किंवा माहिती दिली असेल तरी देखील पी एम किसान चे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.
तसेच अर्ज करत असताना बँक पासबुक बरोबरच जर शेतकऱ्याने आधार कार्ड संबंधीची चुकीची माहिती दिली असेल, तरी देखील पीएम किसान चे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.
तुम्ही नोंदणी करताना बरोबर माहिती टाकली होती की नाही जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
जर अर्जामध्ये चुकीची माहिती असेल तर ती माहिती दुरुस्त करून घ्या, माहिती दुरुस्त केल्यानंतर तुमची अडकलेली PM Kisan ची रक्कम एका आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे. 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. रक्कम जमा झाली नसल्यास तक्रार दाखल करता येते.
खात्यात रक्कम आली की नाही असे तपासा
- पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
- त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा.
- त्याठिकाणी ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
- Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
- लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
- ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.
अशी करा तक्रार
- 13 वा हप्ता जमा झाला नाही तर त्याविषयीची तक्रार करता येते.
- सर्वात अगोदर कृषी अधिकारी, लेखापाल यांच्याकडे चौकशी करा.
- खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगा.
- त्यांच्याकडे तक्रार करुनही समाधान न झाल्यास पीएम-किसान हेल्प डेस्ककडे तक्रार करा.
- pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तक्रार पाठविता येईल.
- पीएम-किसान हेल्प डेस्कच्या 011-23381092 (Direct HelpLine) वर फोन करा.
कृपया आमच्या 'आम्ही शेतकरी' या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा
कृषी मंत्रालयाचे हेल्पलाईन क्रमांक
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
- पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक :155261
- पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011—23381092, 23382401
- पीएम किसान नवीन हेल्पलाइन : 011-24300606
- पीएम किसान अजून एक हेल्पलाइन क्रमांक : 0120-6025109
जर पी एम किसान चा हप्ता वरील सर्व बाबी करून सुध्दा बँक खात्यावर जमा होत नसेल, तर शेतकऱ्याने पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे नवीन बँक अकाउंट काढून घ्यावे. जेणेकरून जेव्हा नवीन हप्ता येईल तेव्हा तुमच्या पोस्ट ऑफिस बँक खात्यात त्याची रक्कम लगेच जमा होईल.
POST OFFICE चे बँक अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला ते बँक अकाउंट PM Kisan च्या अर्ज नोंदणी मध्ये लिंक करावे लागेल, आगोदर लिंक असलेले बँक खाते रद्द करावे लागेल.
त्याचबरोबर जर तुमचे वय जास्त असेल आणि तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुमच्या बोटाचे ठसे, तसेच तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. जेणेकरून Aadhar verification करत असताना तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. (हे E-KYC साठी महत्वाचे आहे)
वरील सर्व बाबी वापरून शेतकरी PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळवू शकतात. जरी तुमच्या खात्यात अजून रक्कम आली नसेल तरीही तुम्ही, वरील स्टेप वापरल्या तर तुमच्या खात्यामध्ये एका आठवड्याच्या आत रक्कम जमा होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवीवर (FD) बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते


Comments
Post a Comment