पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवीवर (FD) बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते
त्यांचा मुख्य हेतु हा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून देणे असतो. त्याच अनुषंगाने यातील काही योजनांना भारतीय आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळते. बँकेतील खात्यात रक्कम पडून राहण्यापेक्षा तिचा सदुपयोग करणे कधीही फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचा मंत्र प्रत्यक्षात उतरविल्यास तुम्हाला जास्त जोखीम न घेताही चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी योग्य नियोजन करणे फायद्याचे ठरते. बचतीतून समृद्धी येते, पण त्यासाठी अगोदर पैशाची गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. पोस्ट खात्यातील या योजनांमध्ये तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीपेक्षाही अधिक परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. या ठेव योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध आहेत.
बँकेच्या एफडीपेक्षा पोस्ट खात्यातील बचत योजनांवर तुम्हाला अधिक परतावा मिळतो. अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खासगी बँका बचत योजनांवर कमी व्याजदर देत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. त्यांना बचत योजनांमध्ये मनासारखा, बाजार भावाप्रमाणे परतावा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतो.
पोस्ट खात्यातील काही योजनांवर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्याचा गुंतवणूक करताना मोठा फायदा मिळतो. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे.
कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकते. हे बँकेत उघडलेल्या बचत खात्यासारखे आहे.
हे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्यासाठी तुम्हाला किमान पाचशे रुपये जमा करावे लागतील.सध्या या खात्यावर ४ टक्के दराने व्याज जमा केले जात आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो.
पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.


Comments
Post a Comment