महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतरगत 50 हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भातील नवीन जी आर आला
एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमधील बंधने दूर करीत नवीन सरकारने हा निर्णय घेतला. एकूण १४ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटी रुपयांचा भार पडेल. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्याचा समावेश यापूर्वीच्या निर्णयात करण्यात आलेला नव्हता. आता तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल.
कृषी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
चालू खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद, तूर यांचे प्रमाणित बियाणे ५० टक्के अनुदानावर व प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘वैयक्तिक शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी बांधव संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र या ठिकाणांवरून अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपला आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.
50 हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भातील नवीन जी आर आला
या संदर्भातील जी आर दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना ५० हजार प्रोत्साहन लाभाची आतुरतेने वाट होती त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.
ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज थकलेले होते त्यांना कर्ज माफी मिळाली. त्यानंतर प्रश्न असा उद्भवला कि जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात त्यांना काय लाभ मिळणार.म्हणून ज्या शेतकरी बांधवानी अल्पमुदतीच्या पिक कर्जाची वेळोवेळी परतफेड केली त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने केली होती.
शेतकरी बांधव अनेक दिवसापासून करताहेत प्रतीक्षा
परंतु हि घोषणा जेंव्हा केली गेली त्यावेळी ठाकरे सरकारला उतरी कळा लागलेली होती त्यानंतर थोड्याच दिवसानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे आता प्रश्न असा पडला होता कि या ५० हजार प्रोत्साहनपर लाभाचे काय होणार. लाभ मिळेल कि नाही.
नंतर आलेल्या शिंदे सरकारने 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभाचा हा निर्णय कायम ठेवला आणि त्या दिवसापासून शेतकरी बांधवाना हे 50 हजार बँक खात्यामध्ये कधी जमा होतील याची आतुरता लागून राहिलेली आहे.
2022 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार ज्या शेतकरी बांधवानी अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले असेल आणि त्याची पूर्णपणे परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
मित्रांनो यादीत नाव पाहण्यासाठी जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्रावर आधार कार्ड नंबर घेऊन जा त्या ठिकाणी खालील प्रमाणे तुमचे नाव यादीत आहे की नाही बघूया .
पीएम किसान योजनेच्या खात्यात नाही जमा झाली रक्कम ? शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार !
.jpeg)


Comments
Post a Comment